दहावी, बारावी परीक्षेची पेपरतपासणी शिक्षकांद्वारे

0
65

>> डिजिटल पद्धतीला फाट

 

यंदा दहावी व बारावी इयत्तेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी डिजिटल पद्धतीने (संगणकाच्या सहाय्याने) न करण्याचा निर्णय गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतला आहे. यंदा पारंपरिक पद्धतीने म्हणजे शिक्षकांद्वारेच उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे मंडळातील सूत्रांनी सांगितले.
गेल्या वर्षी दहावी व बारावी इयत्तेच्या उत्तरपत्रिका डिजिटल पद्धतीने तपासण्यात आल्या होत्या. त्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने टाटा कन्सल्टन्सी कंपनीकडे करार केला होता. मात्र, उत्तरपत्रिकांची डिजिटल पद्धतीने तपासणी करण्यास त्यावेळी शिक्षकांनी विरोध दर्शविला होता.
२०१५ साली प्रायोगिक तत्त्वावर दहावी व बारावी इयत्तेच्या पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी डिजिटल पद्धतीने करण्यात आली होती. तद्नंतर २०१५-१६ यावर्षी दहावी व बारावी इयत्तेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी डिजिटल पद्धतीने करण्यात आली होती. मात्र, परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीवरून प्रश्‍नपत्रिकांची ङ्गेरतपासणी करण्यात आली असता कित्येक विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले होते. बारावी वाणिज्य शाखेतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी दुसर्‍या क्रमांकावर ढकलला गेला
होता.
या पार्श्‍वभूमीवर यंदा उत्तरपत्रिकांची डिजिटल पद्धतीने ङ्गेरतपासणी न करण्याचा निर्णय गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतला आहे.