म्हापशातील व्यापार्‍यांचा सोमवारी पालिकेवर धडक मोर्चाचा इशारा

0
56

म्हापसा नगरपालिकेचे बाजारात कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही. त्यामुळे येथे रस्त्यावर बसून माल विक्री करणार्‍या ङ्गेरी विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोपो कर वसूल करणारे कंत्राटदार दरमहा पालिकेत १० लाख रुपये जमा करून पोचपावती घेतात. त्याशिवाय फेरीविक्रेत्यांकडून गोळा करण्यात येणार्‍या करातून या कंत्राटदाराकडून ५ लाख रुपये दिले जातात. मात्र, ते ते कुणाला दिले जातात ते माहीत नसून पालिकेत हा एक प्रकारचा घोटाळाच चालू आहे. याचा त्रास ग्राहकांना आणि स्थानिक व्यापार्‍यांना सोसावा लागत असल्याचा आरोप म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी केला व या विरोधात येत्या सोमवार दि. २७ रोजी सकाळी १० वा. म्हापशातील व्यापार्‍यांचा धडक मोर्चा पालिकेवर नेण्यात येणार असल्याचा इशारा म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

म्हापसा पालिका मार्केटमध्ये पालिकेच्या आशीर्वादाने सोपोकर गोळा करणार्‍या कंत्राटदाराने बिगर गोमंतकीय फेरीवाल्यांना खुली जागा दिली असल्याने बाजारात दुकानदारांपेक्षा ङ्गेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे. सकाळी ६ पासून रात्री ९ वाजेपर्यंत हे फेरीवाले रस्ता अडवून बसत असल्याने गोमंतकीय व्यापार्‍यांना आपला माल सुद्धा दुकानात नेणे कठीण झाले आहे. पालिकेने पार्किंग व्यवस्थेचे आश्‍वासन देऊनही त्याला हरताळ ङ्गासला आहे. पालिकेच्या या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी दि. २७ रोजी म्हापसा व्यापारी संघटनेचे शिष्टमंडळ व्यापार्‍यांसह पालिकेवर सकाळी १० वा. मोर्चा नेणार असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.
पालिकेच्या गलथान कारभारावर शिरोडकर यांनी यावेळी कडाडून टीका केली. ते म्हणाले की, १ कोटी २० लाख रुपयांना सोपो कर गोळा करण्याचा ठेका घेतलेली व्यक्ती पालिकेला पैसे देते. शिवाय ५ लाख रुपयांची रक्कम कोणाला तरी देते असा गौप्यस्फोट त्यांनी केला. सोपो दर प्रती चौरस मीटर १० रुपये प्रमाणे १ हजार ङ्गेरीवाल्याकंडून ३६ लाख ५० हजार रुपये इतका सोपो कर गोळा होऊ शकतो. मग हा सोपो कर गोळा करणारी व्यक्ती १ कोटी २० लाख रुपये पालिकेला कसा भरणा करतो असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. या गैरव्यवहारामुळे बाजारात बेकायदा व्यवहारांकडे पालिका अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले असल्याचा आरोप त्यांनी केला.
ङ्गेरीवाल्यांनी सोपो करानुसार रोज आपला माल परत नेऊन दुसर्‍या दिवशी जागा मिळेल तिथे व्यवहार करायचा असतो. पण सध्या ङ्गेरीवाले शिल्लक माल तेथेच सुरक्षित बांधून ठेवून घरी जातात व दुसर्‍या दिवशी दुकान खोलल्याप्रमाणे तेथेच ठाण मांडून बसतात. त्यांना कुणीच विचारीत नाही. चौकशी केल्यास त्यांनी ती जागा कुणाकडून तरी रोख पैसे देऊन विकत घेतलेली असल्याची माहिती मिळते. यामुळे बाजारातील अनेक रिकाम्या जागा पुन्हा कशा फेरीवाल्यांनी अडवल्या याची चौकशी पालिका मंडळाने करायला हवी, अशी मागणी व्यापारी संघटनाध्यक्षांनी यावेळी केली. म्हापशाचे नगराध्यक्ष संदीप ङ्गळारी तसेच इतर नगरसेवक बाजारात अधिकृतरित्या ङ्गिरून पाहणी करीत नाहीत. त्यामुळे बाजारातील घडामोडी आणि दुर्दशा त्यांना दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर, सचिव आशिष कार्दोज, सदस्य श्रीपाद सावंत, अमर कवळेकर, नरेश तिवरेकर, श्रीपाद येंडे, गितेश डांगी, महमंद मोतीवाला, नागेश मयेकर, अभिजित शिंदे, राजन पेडणेकर, रमेश गावस, पांडुरंग सावंत, सुधाकर गौडा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.