८ महापालिकांवर भाजपचे वर्चस्व

0
64

>> महाराष्ट्रात भाजपची पुन्हा लाट
महाराष्ट्रात भाजपने विजयाचा धडाका कायम राखताना महापालिका निवडणुकांमध्ये १० पैकी ८ जागी सत्ता काबीज करीत युती तोडून स्वबळावर लढलेल्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपने (८२) शिवसेनेपाठोपाठ (८४) जागा मिळवल्या आहेत.

भाजपने पुणे (८९), नाशिक (६५), उल्हासनगर (३३), पिंपरी-चिंचवड (७८), सोलापूर (४६), अकोला (४८), अमरावती (४५) आणि नागपूर (१०८) या नगरपालिकांमध्ये सर्वाधिक जागा पटकावून वर्चस्व सिद्ध केले आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीला जनतेने पुन्हा एका स्पष्टपणे नाकारले आहे. शिवसेनेने ठाणे महापालिकेच्या ६७ जागा पटकावून वर्चस्व मिळवले आहे. देशातील श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईत सत्ता स्थापनेसाठी चुरस निर्माण झाली आहे. येथे शिवसेनेला भाजपपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या आहेत. कॉंग्रेसला ३१, राष्ट्रवादीला ९ तर मनसेला ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे.