९५७९ सरकारी कर्मचार्‍यांचे आतापर्यंत टपाली मतदान

0
105

आतापर्यंत टपाली माध्यमातून ९५७९ मतदारांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक अधिकार्‍यांनी काल दिली. एकूण १७ हजार ५०० सरकारी सेवक निवडणूक कामावर होते. त्यांच्यासाठी वरील सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या अकरा मार्चपर्यंत सरकारी कर्मचार्‍यांना टपाल माध्यमातून मतदान करता येईल.

टपाली माध्यमातून मतदान करण्यासाठी अधिक काळाची मुदत दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. उमेदवारांनी आपल्याला मत मिळावे म्हणून वरील मतदारांशी संपर्क साधून आमिषे दाखविण्याचेही सत्र अवलंबिले. मतपत्रिकेचा गुप्त क्रमांकही भाजप उमेदवारांकडे असल्याचा आरोप कॉंग्रेस सचिव गिरीश चोडणकर यांनी केला होता.
टपाली मतदान पद्धत रद्द करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या माध्यमातून मतदान करण्याची मागणी कॉंग्रेस व मगो पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु निवडणूक आयोगाने या मागणीस प्रतिसाद दिलेला नाही. त्याचप्रमाणे निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्याच्या सरकारच्या मागणीलाही आयोगाकडून थंडा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर नाराज आहेत.