नवप्रभाच्या अग्रलेख व बातमीस निवडणूक आयोगाचा पुरस्कार

0
238

राज्य निवडणूक आयोगातर्फे मतदार जागृतीसाठी प्रसारमाध्यमांना देण्यात येणारा पुरस्कार दैनिक नवप्रभाला ‘अग्रलेख’ आणि ‘बातमी’ या दोन्ही गटांत प्राप्त झाला आहे. वृत्त लेख व छायाचित्रासाठीचा पुरस्कार ‘गोमंतक टाइम्स’ या इंग्रजी दैनिकास, तर निवडणुकीशी संबंधित खास वृत्तचित्रासाठीचा पुरस्कार ‘इन गोवा’ या वृत्तवाहिनीस प्राप्त झाला आहे.

मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात लवकरच होणार्‍या समारंभात या पुरस्कारांचे वितरण होईल असे राज्य निवडणूक आयोगातर्फे कळविण्यात आले आहे. गोवा विधानसभा निवडणूक काळात मतदार जागृतीसाठी दिलेल्या योगदानासाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.