सर्वप्रथम प्राथमिक वैद्यकीय सुविधांची माहिती असणे आवश्यक ः प्रा. पटेल

0
93

उपचार हा गरीब-श्रीमंत, माणसांची उपचारांवर खर्च करण्याची क्षमता, उपचारानंतर त्यावर दुसर्‍या डॉक्टरना द्यावे लागणारे कमिशन या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच उपचार कसा व कोणत्या प्रकारचा द्यावा हा विचार खाजगी इस्पितळांकडून केला जातो. त्यामुळे जवळच्या व्यक्तींना आजारापासून लांब ठेवणे किंवा त्यांना आजारातून बाहेर काढणे हे फक्त त्या व्यक्तीच्या आपल्या हक्काच्या अशा माणसांवर अवलंबून असते असे वक्तव्य वैद्यकिय क्षेत्रात असूनही आपल्याला करावे लागत आहे असे प्रा. विक्रम पटेल यांनी सांगितले. कोसंबी विचार महोत्सवात ते बोलत होते.

‘आपले आरोग्य आपल्या हाती: पुनर्संकल्पना आरोग्याच्या निगेची’ या विषयावर प्रा. विक्रम पटेल यांनी स्वत:चे अनुभव मांडले. प्रा. विक्रम पटेल हे आंतरराष्ट्रीय मनोविज्ञान प्रभागाचे प्रमुख संशोधक व युके येथील वेलकम ट्रस्ट आरोग्य विज्ञान विभागाचे प्रमुख संशोधक आहेत.
प्रा. पटेल म्हणाले, की देशाच्या काही भागात प्राथमिक आरोग्य सुविधांसाठी लोकांना आजही मोठ्या रांगेत फॉर्म भरून डॉक्टरना भेटल्यानंतरही उपकरणांच्या कमतरतेमुळे जीव गमवावा लागतो. काही सरकारी इस्पितळांमधील डॉक्टर स्वत:च्या खाजगी इस्पितळांसाठी पैसा ओढत असल्याने त्यांना सरकारी इस्पितळात पोचायला उशीर होतो व रूग्ण आपले प्राण गमावतो. त्यामुळे सर्वात प्रथम प्राथमिक वैद्यकीय सुविधांची माहिती असणे गरजेचे आहे. माणूस जेवढा श्रीमंत असतो तेवढी डॉक्टरांकडुन एँजिओग्राफी किंवा हृदयविकाराच्या आजारांची चाचणी त्या माणसाला जास्त वेळा करण्याचा सल्ला दिला जातो. पण अशावेळी या अनन्य प्रकारच्या चाचण्या करायलाच हव्यात असे नसते. माणूस श्रीमंत असला तरी चाचण्या का, कोणत्या आजारासाठी किंवा शिफारस केलेल्याच डॉक्टरकडे का करणे आवश्यक आहे हा प्रश्‍न विचारण्याएवढा डोळस नक्की असला पाहिजे असा सल्ला पटेल यांनी दिला. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविषयीची काही उदाहरणांवरही प्रकाश टाकला. प्रा. पटेल यांनी यांनी सांगितले, की राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणा प्रमाणे देशात १० टक्के लोकांना मानसिक आजार असून त्यांची संख्या सुमारे १ दशलक्ष एवढी होते. १९९६ रोजी मानसिक आजार बळावलेल्यांसाठी ङ्गसंगथफ ही संस्था जन्माला आली. मानसिक आजाराला इतर आजारांप्रमाणेच उपचार हवा असतो, परंतु त्या आजाराकडे पाहण्याची आपली दिशाच काही वेगळी असेल तर उपचार मात्र बाजूलाच राहतो. प्रा. विक्रम पटेल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील वस्तीसाठी आशा वर्कर्स हा उपक्रम राबविला होता. या ठिकाणी न्युमोनिया आजाराने हजारो मुलं प्रत्येक वर्षी दगावली जात असत. प्राथमिक आरोग्य सुविधांच्या अभावामुळे हा प्रकार घडत असल्याचे दिसून आल्याने एका खेड्यातील ङ्गअंजनाफ या बाईला प्राथमिक सुविधांबद्दल शिकविण्यात आले व गावात लहान मुलाला काहीही झाल्यास अंजना प्रथमोपचार करत असे. अंजना जास्त शिकली नव्हती परंतु लहान मुलांवर कशाप्रकारे उपचार करावे याबद्दल तिला प्रशिक्षण देण्यात आले होते.