कायतू सिल्वा प्रकरणी निवाडा दबावाखाली : चर्चिल

0
87

>> मनोहर पर्रीकरांच्या हस्तक्षेपाचा आरोप

बाणावलीचे आमदार कायतान कायतू सिल्वा हे पोर्तुगीज नागरिक नसून भारतीय नागरिक असल्याचा निवाडा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या विदेश व्यवहार विभागाने दिलेला आहे तो राजकीय दबावाखाली दिला आहे, असा दावा माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी काल पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी जॉन फर्नांडिस यांनी केंद्रीय गृहमंत्रालयात तक्रार केली. आपली कन्या वालंका आलेमाव हिने तक्रार केली नव्हती. असे सांगून चर्चिल आलेमाव म्हणाले, या अगोदर गृहमंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी कायतूंच्या विरोधात निवाडा दिला होता. त्यांच्या जागी दुसर्‍या अधिकार्‍याला आणून हा निवाडा देण्यासाठी भाग पाडले आहे, असे चर्चिल यांनी म्हटले आहे.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा या निवाड्यात हस्तक्षेप झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला. गोवा विधानसभेची निवडणूक दि. ४ फेब्रुवारी रोजी होती. त्या तीन दिवसअगोदर दि. ३१ जानेवारी रोजी गृहमंत्रालयाचे या विभागाचे संचालक प्रवीण होरो सिंग यांनी वरील निवाडा दिला. याचा अर्थ निवडणुकीत त्यांना फायदा व्हावा यासाठी हे केलेले कारस्थान होते. वालंका आलेमाव यांचा खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.