इस्रोने घडविला इतिहास

0
95

>> एकाच वेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण

 

एकाच वेळी ३७ उपग्रह सोडण्याचा रशियाचा विक्रम मोडीत काढीत भारतीय अवकाश संशोधन केंद्र तथा इस्रोने १०४ उपग्रह अवकाशात सोडून काल इतिहास घडवला. आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा अवकाश केंद्रावरून इस्रोने ही कामगिरी साकारली. इस्रोच्या या धवल यशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. यासाठी शास्त्रज्ञांना भारतीयांचा सलाम असे त्यांनी नमूद केले आहे.
याआधी २०१५ साली इस्रोने एकाच वेळी सर्वाधिक २० उपग्रह सोडण्यात यश मिळविले होते. इस्रोने आतापर्यंत अवकाशात सोडलेल्या उपग्रहांची संख्या २२६ वर गेली आहे. कालच्या उपग्रहांमध्ये अमेरिकेचे दोन व इस्रायल, कझाकिस्तान, हॉलंड, स्वीत्झर्लंड व यूएई यांचे प्रत्येकी एक उपग्रह आहेत.