मुलांमधील कुतुहल जागविणे पालक, शिक्षकांचे काम ः डॉ. मित्रा

0
79

शिक्षक किंवा पालकांचे काम असते. मुलांना परिक्षांमध्ये बांधून न ठेवता त्यांना इतर मुलांबरोबर निरनिराळ्या विषयांवर चर्चा करून शिकायला लावल्यास व यावेळी त्यांच्या हाती एखादा संगणक दिल्यास मुलं चांगल्या प्रकारे ती गोष्ट आत्मसात करू शकतील असा दावा डॉ. सुगाता मित्रा यांनी केला.

डी. डी . कोसंबीविचार महोत्सवात ‘द फ्युचर ऑफ लर्निंग’ या विषयावर डॉ. सुगाता मित्रा आपले मत मांडत होते.
डॉ. सुगाता मित्रा म्हणाले, की एक काळ होता ज्यावेळी संपूर्ण देश संगणकाशी मैत्री करण्याला धडपडत होता. संगणक कसा चालवावा, त्याला कोणकोणते पार्ट असतात तसेच संगणकाशी निगडीत विविध अभ्यासक्रम शिकण्याच्या प्रयत्नात लोक होते. परंतु एका बाजूला झोपडपट्टीत राहणार्‍या मुलांना संगणक या नावाचाही पत्ता नव्हता. अशा वेळी डॉ. मित्रा यांनी आयुष्याच्या एका टप्प्यावर असे अनुभवले की या मुलांनाही संगणक शिकविला जाऊ शकतो व ते एकमेकांच्या मदतीने तो शिकु शकतात. गटातील काही मुलांना संगणकासह इंटरनेट दिला असता ती कोणत्याही प्रश्‍नांचं उत्तर शोधून समजून घेऊ शकतात यावर आपला दृढ विश्‍वास असल्याचे डॉ. मित्रा यांनी सांगितले.
एकटे शिकण्यापेक्षा एकत्र मुले खूप काही शिकू शकतात व गटात शिकलेले कायम समजायला सोपे जाते. गटात ज्यावेळी आपण कोणतीही गोष्ट शिकतो त्यावेळी अदृश्य अशी ‘सेल्फ ऑर्गनाइजिंग सिस्टम’
आपल्यात निर्माण होते जी एकमेकांच्या सहाय्याने गोष्टी समजून घ्यायला आपल्याला मदत करते. ‘सेल्फ ऑरगनाइज्ड लर्निंग सिस्टम’ च्या मदतीने मुलं आपल्याला अपेक्षित उत्तरापेक्षा इतरही बर्‍याच गोष्टी शिकू शकतात. फार वर्षांपूर्वीची शिक्षण पध्दती आजही आपण वापरत आहोत. परंत या पध्दतींनी आपण विद्यार्थ्यांचे भविष्य घडवित नसून आपण करोडो कारकून बनवित आहोत असे मत मित्र यांनी व्यक्त केले.