पर्यावरण संवर्धनासाठी स्थानिक पातळीवरही कृती हवी : कडूर

0
105

‘पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवर विचार करणे व चर्चा आवश्यक आहेच, पण स्थानिक पातळीवरही प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. संस्कृती आणि निसर्ग या एकमेकांशी जोडलेल्या गोष्टी आहेत संस्कृती आणि निसर्ग या एकमेकांशी जोडलेल्या गोष्टी आहेत. आज पर्यटनाचा अतिरेक होत असल्याने त्याचे नियोजन आवश्यक आहे’ असे प्रतिपादन ‘नॅशनल जॉग्राफिक चॅनल’चे अन्वेषक आणि वन्यजीव छायाचित्रकार संदेश कडूर यांनी काल येथे केले. डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाच्या शुभारंभी व्याख्यानात ते बोलत होते.

कडूर यांनी ‘भारतातील जीवनाधार असलेले पर्वत’ या शिर्षकाखाली भाष्य करताना भारतातील हिमालय, पर्वत शिखरे आणि वनराई व निसर्गसंवर्धनाचे महत्व याविषयी महत्वाचे मुद्दे मांडले. कडूर यांनी त्यांचे हिमालयातील वास्तव्य, भूतान मधील डोंगर, वन्यप्राणी इत्यादींविषय बरीच माहिती पॉवरपाईंटच्य माध्यमाने दिली. वाघांच्या शिकारी व अन्नाच्या सर्वसाधारण वागणुकीविषयी सांगताना त्यांनी वाघांची अतिशय जवळून घेतलेली छायाचित्रेही सादर केली. २०१४मध्ये घेतलेल्या सर्वेक्षणापर्यं भारतात जीव जंतूंच्या ५६४ नवीन प्रजाती शोधण्यात आलेल्या असल्याचे कडूर म्हणाले. धरणाबद्दलच्या कल्पना आधुनिक काळाच्या अनुषंगाने सुधारल्या पाहिजेत. बिबट्या व इतर प्राण्यांची व पक्ष्यांची शिकार होत असल्याने त्यांच्या शिकारीवर बंदी घातल्यास त्यांची संख्या वाढू शकते. हिमालय पर्वत हे जनजीवन व वन्यजीवांना नवसंजीवनी देणारे पर्वत आहेत. फार पूर्वीपासून प्रचलित असलेल्या पुराण कथांमुळे निसर्गाचे संरक्षण व संवर्धन झाले, ते पुढे टिकले पाहिजे व त्यामुळे ही संस्कृतीही टिकली पाहीजे, असे कडूर यांनी नमूद केले.

पर्यटन दुधारी शस्त्र
पर्यटन हे एक दुधारी शस्त्र आहे. आज ‘जबाबदारीने करण्यात येणारे पर्यटन’ वा ‘रिस्पॉनसिबल टुरिझम’ ही संज्ञा वापरली जाते. पर्यटनाविषयी धोरणे ठरविताना व प्रत्यक्ष कृतीत उतरविताना त्याचे योग्य नियोजन करणे आणि अनिर्बंधपणे ती ठिकाणे खुली करणे टाळणे या गोष्टी आवश्यक असल्याचे कडूर म्हणाले. आज नको इतक्या प्रचंड प्रमाणात इको टुरिझम होत असल्याचे एक प्रश्‍नाचे उत्तर देताना कडूर म्हणाले. कला व संस्कृती सचि व दौलत हवालदार यांच्या हस्ते या विचार महोत्सवाच्या पहिल्या व्याख्यानपुष्पाचे उद्घाटन झाले. पश्‍चिम घाटावरील जैविक संपत्ती पाश्‍चिमात्यांना भारतात येण्यास भुरळ घालते.7