पंचायत निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

0
126

पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने सुरू केलेल्या प्रभाग ङ्गेररचनेचे काम पंचायत खात्याने स्थगित ठेवले असून पंचायत निवडणुकीची तारीखही नव्या सरकारने ठरवावी, असे ठरविले आहे. त्यामुळे दि. २१ मे रोजी निश्‍चित केलेली पंचायत निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुका दि. २१ मे रोजी घेण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे पंचायत खात्याने प्रभाग ङ्गेररचनेची प्रक्रिया सुरू केली होती. गोवा ङ्गॉरवर्डसह अन्य पक्षांनी वरील प्रस्तावास तीव्र हरकत घेतली होती.
निवडणूक आचारसंहिता लागू असताना प्रभागांची ङ्गेररचना करणे अयोग्य असल्याचे मत गोवा ङ्गॉरवर्डचे अध्यक्ष प्रभाकर तिंबले यांनी व्यक्त केले होते. त्याचप्रमाणे प्रभागांची ङ्गेररचना करण्याचे काम राज्य निवडणूक आयोगातर्ङ्गेच व्हावे, असेही त्यांनी म्हटले होते. वरील प्रकरणी आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सरकारने प्रभाग ङ्गेररचनेचे काम स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभाग फेररचना स्थगित ठेवा ः भाजप
सध्या निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असल्याने राज्यातील पंचायतींच्या प्रभागांची फेररचना करण्याची प्रक्रिया चालू ठेवणे अयोग्य आहे. या संदर्भात अनेक तक्रारीही आल्या आहेत. त्यामुळे प्रभाग ङ्गेररचनेची प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी प्रदेश भाजपने केल्याची माहिती भाजप नेते तथा दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंचायत निवडणुका घाईगडबडीत घेण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने वरील प्रकरणी हस्तक्षेप करावा व प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
नवीन सरकार भाजपचेच
आपल्या पक्षाच्या सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. या पार्श्‍वभूमीवर दि. ४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. त्याचा लाभ भाजपला होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
काल सकाळी प्रदेश भाजपच्या गाभा समितीची बैठक होऊन मतदानाचा आढावा घेण्यात आला. भाजपने निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाला किमान २६ जागा मिळेल, असा दावा केला होता. आताही त्यात कोणताही बदल झालेला नाही, असे सावईकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.