मडगाव मतदारसंघातून विजय निश्‍चित : दिगंबर

0
105

मडगाव मतदारसंघातून आपला विजय निश्‍चित असून आपणाला ङ्गेरमतदानाची चिंता नव्हती, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

मडगाव शहरात हल्लीच झालेली ‘सेमी ङ्गायनल’ मी मोठ्या ङ्गरकाने जिंकलो होतो. त्यामुळे मतदारसंघातील आके येथील मतदान केंद्र
क्रमांक ८ वर जे ङ्गेरमतदान घ्यावे लागले त्या घटनेने निराश होण्याचा अथवा तणावाखाली येण्याचा प्रश्‍नच नसल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर आपण मडगाव मतदारसंघातून मोठी आघाडी घेऊन विजयी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आके मतदान केंद्रावर चाचणी मतदानाच्या वेळी जी मते देण्यात आली ती काढून टाकणे राहून गेल्याने घोळ निर्माण झाल्याचे जेव्हा आपणाला कळले तेव्हा आपण त्याविषयी जास्त विचार केला नाही. घोळ झाला असेल तर ङ्गेरमतदान घेण्यात येईल याची आपणाला खात्री होती. ङ्गेरमतदान झाले म्हणजे माझे नुकसान होईल असेही काही नाही.
ङ्गेरमतदान घेण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असल्याने मी त्याबाबत डोक्याला त्रास करून घेतला नसल्याचे ते म्हणाले.
दिगंबर कामत हे ९४ सालापासून आजतागायत
मडगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. ९४, ९९, २०००, २००५, २००७ व २०१२ असे सहा वेळा ते मडगाव मतदारसंघातून विजयी झालेले आहेत.