वेतन आयोग लागू करताना घरभाडे व प्रवास भत्ता नाही

0
240

>> सरकारी कर्मचार्‍यांना प्रतीक्षा

राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असला तरी घरभाडे व प्रवास भत्ता देण्यात आला नसल्याने या भत्त्यांची प्रतीक्षा असल्याचे गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सातव्या वेतन आयोगात घरभाडे भत्ता व प्रवास भत्ता हा मूळ पगाराच्या ८ टक्के एवढाच देण्याची शिङ्गारस करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचार्‍यांनी त्याला आक्षेप घेतल्यानंतर केंद्र सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने अभ्यास करण्यासाठी ९० दिवसांचा अवधी मागून घेतला होता. मात्र, त्यानंतर समितीने आणखी दोन महिन्यांचा अवधी मागून घेतला. केंद्र सरकारच्या समितीने त्याबाबत अद्याप अहवाल दिलेला नसल्याने राज्य सरकारांवर घरभाडे भत्ता व प्रवास भत्ता याला हात न लावताच सातवा वेतन आयोग लागू करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे पगार म्हणावा तेवढा न वाढल्याने सरकारी कर्मचारी नाराज असल्याचे नाझारेथ यांनी सांगितले. मात्र, केंद्र सरकारच्या समितीने अहवाल दिल्यानंतर त्यांच्या शिङ्गारशीनुसार गोवा सरकारी कर्मचार्‍यांना घरभाडे भत्ता व प्रवास भत्ता वाढवून मिळणार असल्याचे नाझारेथ यांनी सांगितले. तोपर्यंत गोवा सरकारी कर्मचार्‍यांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील स्वायत्त संस्था व सरकारी महामंडळातील कर्मचार्‍यांना गोवा सरकारने सातवा वेतन आयोग लागू न केल्याने सदर कर्मचारी नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वायत्त संस्था व महामंडळातील कर्मचार्‍यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा अशी सरकार दरबारी मागणी करण्यात येणार असल्याचे नाझारेथ यांनी सांगितले.