कोरगाव येथे वासनांध योगा शिक्षकाला अटक

0
115

>> अमेरिकन महिलेची लैंगिक अत्याचाराची तक्रार

कोरगाव, पेडणे येथे एका ३२ वर्षीय अमेरिकन पर्यटक महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी शिवोली येथील प्रतीक कृष्णकुमार (३८) या योगा शिक्षकाला अटक केली असून काल त्याला वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयासमोर हजर केले असता ८ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कॅलिङ्गोर्निया, अमेरिका येथील नागरिक आहे. संशयित शिवोली येथे राहत असून त्याचे कोरगाव, पेडणे येथे होलिस्टिक योगा व आयुर्वेद केंद्र आहे. पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत संशयिताने २ ङ्गेब्रुवारी रोजी ती मसाज करण्यासाठी संशयिताच्या मसाज केंद्रावर केली होती. त्यावेळी त्याने संध्याकाळी ४ ते ७ दरम्यान मसाज केंद्रात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे.
संशयित योगा शिक्षक असून त्याने तांत्रिक पद्धतीने मसाज करण्याचे निमित्त करून पीडितेला तिच्या अंगावरील कपडे उतरवण्यास लावले व नंतर तोही विवस्त्र झाला. त्यानंतर त्याने बळजबरीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केले. संशयिताने तिच्या कॅनडाच्या नागरिक असलेल्या मैत्रिणीवरही असेच लैंगिक अत्याचार केल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.
पीडित अमेरिकन पर्यटक महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर पेडणे पोलिसांनी संशयित योगा शिक्षक कृष्णकुमार अगरवाल याच्याविरोधात भादंसं कलम ३७६ व ३५४ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी सांगितले की, पीडित महिला योगा प्रशिक्षण घेण्यासाठी ३१ जानेवारी रोजी गोव्यात आली होती. सुरुवातीला तिला इतर प्रशिक्षणार्थ्यांसोबत प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, नंतर संशयिताने एकांतात प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने बोलावून लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आल्याचे सांगितले. पीडितेच्या कॅनडियन मैत्रिणीचीही जबानी घेण्यात आली आहे. तिनेही तांत्रिक मसाज संशयिताने दिल्याची माहिती दिली असून या प्रकरणी तपास सुरू असल्याचे परब यांनी सांगितले. अन्य प्रशिक्षणार्थ्यांच्या जबान्या घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.