भाभासुमंचे माध्यम आंदोलन निवडणुकीनंतरही चालेल : वेलिंगकर

0
54

गोवा सुरक्षा मंचाचा महत्वाचा घटक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही स्वयंसेवक भाजपला मतदान करणार नाही असा दावा गोवा सुरक्षा मंचाचे नेते सुभाष वेलिंगकर यानी काल पत्रकार परिषदेत केला. भाभासुमंचे माध्यमविषयक आंदोलन निवडणुकीनंतरही सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

माध्यम प्रश्‍नावर भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली व आपल्यासह भाभासुमंच्या सर्व नेत्यांवर वैयक्तिक सूड उगविण्याची संधी सोडली नाही. आता भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.
येत्या निवडणुकीत गोवा सुरक्षा मंच मगो, शिवसेना युतीला २२ जागा मिळतील असा दावाही वेलींगकर यांनी केला.
पत्रकार परिषदेस सुभाष देसाई, ऍड. उदय भेंब्रे. फा. आताईद, अरविंद भाटीकर, पांडुरंग नाडकर्णी, रामदास सराफ आदी उपस्थित होते.