प्रचंड मताधिक्क्याने मांद्रेत विजयी होणार : पार्सेकर

0
69

आपण ६००० हजार मताधिक्याने चौथ्यांदा विजयी होणार अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना दिली.

मुख्यमंत्री पार्सेकर यांनी काही वर्तमान पत्रांनी पेडणेचे चित्र भाजपच्या विरोधात चित्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र पेडणे मतदारसंघातून राजेंद्र आर्लेकर व मान्द्रेमधून आपण चौथ्यांदा विजयी होणार असल्याचा पुनरुच्चार केला. विरोधकाकडे कोणताच विकासाचा मुद्दा नाही, केवळ निवडणुका जवळ आल्या कि मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करून जर मते मिळत असेल तर कुणीही सोम्या गोम्या आमदार झाला असता असे सांगून स्वाभिमानी पेडणेकरांनी आतापर्यंत ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्याला जवळ केले नाही, मतदारसंघात तर बंडखोरांना मतदारांनी स्थान दिले नाही, आपण व राजेंद्र आर्लेकर यांनी जी विकास कामे केली त्या बळावर व विकासाचा मुद्दा, मतदार समोर ठेऊन भाजपला संधी देणार असल्याचे सांगितले. मांद्रे आणि पेडणे या दोन्ही मतदार संघातील मतदाराची नाडी ओळखलेली आहे भाजपच तालुक्याचा व पर्यायाने राज्याचा चौफेर व नियाजन बद्ध विकास करू शकतो याची जाणीव मतदारांना असल्याने भाजपला संधी देतील असा विश्वास व्यक्त केला.