विटामिन ‘बी-कॉम्प्लेक्स’

0
581

विटामिन म्हणजेच जीवनसत्व ही सेंद्रीय संयुगे असतात जी माणसाच्या शरीरासाठी विशिष्ट प्रमाणात आणि त्यातील निरनिराळ्या अवयवांची कार्ये उत्तम रीतीने चालण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. ही जीवनसत्वे तुम्हाला निरोगी राहण्यासाठी तसेच मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी मदत करतात. त्यामुळे यांच्या कमतरतेमुळे तुम्हाला विविध आरोग्याच्या समस्या आणि आजार होऊ शकतात. व्हिटॅमिन-‘बी’ चे अनेक उपप्रकार आहेत ज्यांना एकत्रितपणे ‘‘बी-कॉम्प्लेक्स विटामिन्स’’ असे म्हणतात. ही विटामिन्स तुमच्या जीवनातील ताण कमी करतात आणि तुमची ऊर्जेची पातळी वाढवतात, हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. ते नैराश्याबरोबर लढतात, मेंदूला वृद्ध होण्यापासून रोखतात आणि तुमचे आयुष्य वाढवतात. इथे बी-विटामिन तुमच्या मेंदूला निरोगी राखण्यास कशी मदत करते ते पाहू या.

१. मानसिक स्थिती ढासळण्यापासून बचाव करते –
बी-विटामिनचे तीन प्रकार तुमच्या मेंदूचे रक्षण करतात ते आहेत – बी६, बी१२ आणि बी९ (फोलिक ऍसिड). त्याबरोबरच हे तीन विटामिन्स स्मृतीभ्रंश आणि अल्झायमर रोगापासूनही तुमचा बचाव करतात.
२. डोपामीन बूस्टर्स म्हणून काम करतात –
डोपामीन हे मेंदूमध्ये असलेले एक न्युरोेट्रान्समीटर आहे जे माणसामधील उत्पादनक्षमता, कार्यक्षमता आणि एकाग्रता वाढवते. याच्यामुळे तुमचा मेंदू चांगल्या स्थितीत राहून तुम्ही आनंदी राहता. बी विटामीन हे डोपामीनची पातळी वाढवून तुमच्या मेंदूला निरोगी ठेवते.
३. बी-विटामिनमुळे मानसिक विकार टाळता येतात –
बी१२ या विटामिनची कमतरता असेल तर काही मानसिक विकार जसे स्मृतीभ्रंश, मेंदू सुकणे किंवा लहान होणे, नैराश्य आणि स्किझोफ्रेनिया होऊ शकतात. पण तुम्ही बी१२ च्या गोळ्या घेऊन यांना दूर ठेवू शकता.
४. स्मृती तेजस्वी बनवतात –
जर काही कारणाने तुम्हाला ‘शॉर्ट टर्म मेमरी’ म्हणजे अगदी थोड्यावेळापूर्वीची गोष्ट विसरणे किंवा इतर स्मृतिविषयक समस्या असतील तर तुम्ही बी-विटामिन्सची कोणत्याही प्रकारची औषधे घेतली तर तुमची मेंदूची स्थिती चांगली राहील.
विटामिन बी१ – थायमिन ः हे विटामिन नवीन पेशी तयार करण्यासाठी आवश्यक असते आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. ताण कमी करण्यास मदत करते.
विटामिन बी२ – एक रासायनिक भाग – हे लाल रक्तपेशींची निर्मिती करते व शरीरात ऑक्सीजनची वाहतूक करण्यात मदत करते. या विटामीनमध्ये अँटीऑक्सीडन्टस् असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी ओळखले जाते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.
विटामिन बी३ – नियासिन. कोलेस्ट्रॉलसाठी हे आवश्यक असते. हे चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या निर्मितीला प्रोत्साहन देते आणि हृदयरोगाला प्रतिबंध करते.
विटामिन बी५ – एक जीवनसत्व. चरबी आणि कर्बोदकांच्या चयापचयासाठी आवश्यक असते. काही संप्रेरकांच्या उत्पादनासाठी आवश्यक आहे. तसेच त्वचेसाठी फायदेशीर असून त्वचेवरील डाग व सुरकुत्या कमी करते.
विटामिन बी६ – पायरीडॉक्सीन. झोप व मूड नियंत्रणात प्रमुख भूमिका. यामुळे भावनिक स्थिती सामान्य ठेवण्यासाठी लागणारे अमाईन, मेलॅटोनिन, न्युरोट्रान्समीटर्सची निर्मिती करते. त्वचा व नखांसाठी फायदेशीर. संधिवातास लाभदायी.
बी७ – बी कॉम्प्लेक्सचा एक भाग. हे जीवनसत्व सौंदर्यासाठी उपयोगी म्हणून ओळखले जाते. तसेच ग्लुकोजची पातळी व्यवस्थित ठेवते. गर्भधारणेमध्ये हे विटामिन महत्त्वाचे असून ते बाळाच्या वाढीसाठीही आवश्यक असते.
विटामीन बी९ – फोलेट. बाळातील गर्भातील दोष होऊ नये यासाठी उपयोगी. तसेच लाल रक्तपेशींच्या माध्यमातून ऑक्सीजनचे वहन करते.
विटामीन बी १२ – कोबालामिन याचे कार्य योग्य रीतीने आहे की नाही हे पाहणे आवश्यक ठरते. याच्या कमतरतेमुळे माणसाला अशक्तपणा येतो. ते मुख्यतः मांसाहारी पदार्थांमध्ये उपलब्ध असते.