२७२ उमेदवारी अर्ज ग्राह्य

0
77

 

>> अंतिम उमेदवार संख्या आज स्पष्ट होणार
>> आज संध्याकाळपासून अधिकृत प्रचार
>> मुख्य निवडणूक आयुक्त उद्या गोव्यात

जकीय पक्षांतर्फे व अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी आलेल्या एकूण ४०५ उमेदवारी अर्जांपैकी छाननीनंतर २७२ ग्राह्य ठरविण्यात आले. आज दि. २१ रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने संध्याकाळपर्यंत प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतील याचे चित्र स्पष्ट होईल.
आज संध्याकाळपासून उमेदवारांचा अधिकृत प्रचार सुरू होईल. प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक निवडणूक अधिकार्‍यांना मार्गदर्शन करणे व प्रत्यक्ष तयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक अधिकार्‍यांचे पथक आज गोव्यात दाखल होईल. उद्या मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी गोव्यात येतील अशी माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी दिली.