कॉंग्रेस नेते एन. डी. तिवारी यांचा भाजपात प्रवेश

0
67

विविध गोष्टींमुळे वादग्रस्त ठरलेले उत्तराखंड व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तथा एन. डी. तिवारी यांनी काल पक्षत्याग करून भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांचा मुलगा रोहित तिवारी यानेही भाजपप्रवेश केला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचे स्वागत केले.

९१ वर्षीय एन. डी. तिवारी केंद्रीय मंत्री तसेच आंध्र प्रदेशचे राज्यपालही होते. राज्यपालपदी असताना लैंगिक प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याने त्यांना पदत्याग करावा लागला होता. तसेच रोहित शेखर तिवारी याने त्यांच्याविरोधात पितृत्वविषयक खटला घातल्यानंतर रोहित याला आपला मुलगा म्हणून त्यांना स्वीकारावा लागला. हा खटला सहा वर्षे चालला होता.
उत्तराखंडमधील राजकीय स्थितीमुळे एन. डी. तिवारी यांचा भाजप प्रवेश तेथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निरीक्षक व्यक्त करीत आहेत.
भाजपात प्रवेश करण्याचे कारण विचारले असता कॉंग्रेस व भाजपात मुलत: फरक नसल्याचे ते म्हणाले. तर रोहित याने आपल्या वडिलांचा कॉंग्रेसमध्ये सातत्याने अपमान होत होता असे सांगितले.