गोवा सुराज पार्टीचे आठ उमेदवार जाहीर

0
48

गोवा सुराज पार्टीने काल आठ मतदारसंघातील आपले उमेदवार घोषित केले. आणखी एक-दोन मतदारसंघात सुराज पार्टीचे उमेदवार निश्‍चित होतील अशी माहिती सरचिटणीस इनासियो वाझ यांनी दिली. पक्षाचे नेते मिकी पाशेको, झरिना कुन्हा व आठही उमेदवार उपस्थित होते.

उमेदवार पुढीलप्रमाणे ः- नुवे –
मिकी पाशेको, साखळी – मौलाली शेख, म्हापसा – ऍड. रामेश्वरी मोरजकर, सांतआंद्रे – लेवकार्ड मोंतेरो, कुठ्ठाळी – शरण मेती, बाणावली – जॉन ङ्गर्नांडिस, वेळ्ळी – डॉमनिक नोरोन्हा, केपे – चार्लस डिसिल्वा. कळंगुट येथे रुबन ङ्गर्नांडिस यांचे नाव निश्‍चित होण्याची शक्यता आहे.
भाजपा हा शत्रू असून, त्याला पराभूत करून जनतेच्या हिताचे सरकार आणण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी समविचारी पक्षांनी युती करावे गरजेचे असल्याचे आमचे मत आहे असे मिकी पाशेको यांनी सांगितले.
कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते
गोवा विकास पार्टीत
दरम्यान, माजी मंत्री ज्योकीम
आलेमाव यांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग केल्यानंतर काल कुंकळ्ळीचे कॉंग्रेसचे ऍड. जॉन मोंतेरो यांनी अनेक कार्यकर्त्यांसह गोवा विकास पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष लिंडन मोंतेरो व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जॉन मोंतेरे हे कुंकळ्ळीचे गोवा विकास पार्टीचे उमेदवार असल्याचे लिंडन मोंतेरो यांनी जाहीर केले. या अगोदर पक्षाने सांगे, पेडणे, नावेली, कुठ्ठाळी उमेदवार जाहीर केले होते.
कॉंग्रेस पक्षासाठी कित्येक वर्षापासून आपण निष्ठेने कार्य केले. पण अशा कार्यकर्त्यांना कॉंग्रेस पक्षात स्थान नसल्याचे मोंतेरो यांनी सांगितले.