कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीच्या प्रस्तावास मान्यता

0
69

>> आज होणार अधिकृत घोषणा

 

बर्‍याच प्रयत्नांनंतर कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्डकडे युती करण्याचा प्रस्ताव मान्य केला असून आज दुपारपर्यंत कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यासंबंधीच्या अधिकृत निर्णयाची घोषणा करतील.
कॉंग्रेसने गोवा फॉरवर्डला फातोर्डा, शिवोली व साळगाव हे तीन मतदारसंघ सोडण्याचे व कळीचा मुद्दा ठरलेल्या वेळ्ळी मतदारसंघात मित्रत्वाची लढाई लढण्याचे ठरले आहे. कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष लुईझिन फालेरो व त्यांचे काही सहकारी असलेल्या कॉंग्रेसच्या एका गटान गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे युती करण्यास विरोध केला होता. त्यामुळे युती संकटात आली होती. गोवा फॉरवर्डचे मार्गदर्शक अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांना दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिल्लीत बोलावून वाटाघाटी केल्या होत्या. सरदेसाई यांनी वेळ्ळीसाठी आग्रह धरल्याने युतीसमोर अडचण निर्माण झाली होती. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी वरील युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न चालवले होते.