गोवा फॉरवर्डला दोन जागा सोडण्याची कॉंग्रेसची तयारी

0
82

>> युतीची बोलणी वेळ्ळीवर ठरणार?

अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्डला ३ ऐवजी   फा फॉ व शिवोली हे दोन मतदारसंघ देण्याचे मान्य केले असून सध्या वेळ्ळी या मतदारसंघाबाबत वाटाघाटी सुरू आहेत. वेळ्ळीबाबत गोवा फॉरवर्ड आग्रही आहे. युनायटेड गोवनचे सर्वेसर्वा बाबूश मोन्सेर्रात यांनी पणजीच्या एका जागेवर समाधान मानल्याने त्यांचा प्रश्‍न सुटला आहे.
कॉंगे्रसच्या एका स्थानिक नेत्याने गोवा फॉरवर्डबरोबर युती करण्यासाठी कॉंग्रेस श्रेष्ठींचे मन वळविण्याचे काम केले होते. परंतु काल झालेल्या दीर्घ चर्चेनंतर गोवा फॉरवर्डला दोन जागा देण्याचा निर्णय घेऊन तो फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांना कळविण्यात आला.
कॉंग्रेसचा पाठिंबा नसताना श्री. सरदेसाई यांना निवडणूक लढविणे जड जाऊ शकते. वरील वृत्त गोव्यात पोहोचताच गोवा फॉरवर्डच्या कार्यकारी समितीने तातडीची बैठक घेऊन कॉंग्रेसच्या उमेदवारी वाटप पद्धतीबाबत असमाधान व्यक्त केले. त्यामुळे त्यांनी ‘एकला चलो रे’चा विचार सुरू केला आहे. मात्र, असे असले तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा फॉरवर्ड व युनायटेड गोवन या दोन्ही पक्षांशी युती करण्याच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी फॉरवर्डचे विजय सरदेसाई व युनायटेड गोवनचे बाबूश मोन्सेर्रात यांना दिल्लीत बोलावून घेतले होते.