उमेदवारी अर्ज आजपासून स्वीकारणार

0
63

>> विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

>> ४० भरारी पथके कार्यरत

येत्या ४ ङ्गेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ या दरम्यान उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येतील. निवडणूक अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ आहे. मतदारयादीचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून ४० मतदारसंघांसाठी २९ निर्वाचन अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यभरात १३ नियंत्रण कक्ष आणि ४० भरारी पथके कामाला लागली आहेत.

अर्ज भरताना उमेदवारांना आपल्या सोबत केवळ ४ जणांना निर्वाचन अधिकार्‍यांच्या कार्यालयात नेता येणार आहे. निवडणूक अर्ज भरायला जाताना उमेदवारांना रॅली काढता येणार नसून निर्वाचन अधिकार्‍यांच्या कार्यालयाबाहेरही समर्थकांना गर्दी करता येणार नाही. निवडणूक अर्ज भरायला जाताना उमेदवारांना मोटारसायकल रॅली काढता येणार नाही.
११ ते १८ जानेवारी या दरम्यान
उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असले तरी शनिवार दि. १४ जानेवारी रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सुटी असेल. त्यामुळे त्या दिवशी तसेच १५ रोजी रविवार असल्याने त्या दिवशीही
उमेदवारी अर्ज भरता येणार नाहीत. तिसवाडी तालुक्यातील उमेदवारांसाठी पणजीत चार ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. यंदा प्रथमच गोवा मनोरंजन सोसायटीच्या इमारतीतही निवडणूक अर्ज भरण्याची सोय करण्यात आलेली आहे. बार्देशमधील उमेदवारांचे अर्ज म्हापसा येथे तसेच सासष्टी, पेडणे, मुरगाव, सांगे, ङ्गोंडा, केपे, काणकोण, डिचोली आदी तालुक्यातील उमेदवारांचे अर्ज संबंधित तालुक्यात स्वीकारले जातील.
अर्ज सादर करणार्‍या उमेदवारांकडून १० हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात येईल. अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना ५० टक्के सूट असून त्यांना ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. मात्र, अर्ज भरतेवेळी त्यांना जातीचा दाखला बंधनकारक करण्यात आला आहे.
ज्या लोकांकडे बंदुका आहेत त्यांनी त्या यापूर्वीच पोलिसांकडे जमा केल्या आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांची यादी तयार केलेली आहे. गरज पडल्यास त्यांपैकी काही जणांना हद्दपारही करण्यात येणार आहे. धर्माच्या नावाने मते मागण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली आ

आयकर खात्याचा तक्रार
नोंदण्यास टोल फ्री नंबर

मतदारांना आमिषे दाखविण्यासाठी उमेदवारांकडून पैसे किंवा भेटवस्तूंचे वाटप होत असल्यास त्याविषयी तक्रार नोंदवण्यासाठी आयकर खात्याच्या पणजी संचालकांनी टोल फ्री नंबर सुरू केला आहे. १८००२३३३९४१ असा हा नंबर असून तो २४७ तास कार्यरत राहील. नागरिक सदर नंबरवर किंवा सेरशश्रशलींळेपीऽळपलेाशींरु.सेर.ळप या इमेलवर माहिती तसेच तक्रार नोंदवू शकतात. तक्रारदाराचे नाव व माहिती गोपनिय ठेवण्यात येईल.