गोवा ङ्गॉरवर्ड, युगोपशी युतीला कॉंग्रेस पक्षाची तत्त्वतः मान्यता

0
97

काल नवी दिल्लीत रात्री झालेल्या केंद्रीय निवडणूक छाननी समितीच्या बैठकीत कॉंग्रेसने विजय सरदेसाई यांच्या गोवा ङ्गॉरवर्ड व बाबूश मोन्सेर्रात यांच्या युनायटेड गोवन्स पक्षाबरोबर दि. ४ रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत युती करण्यास तत्त्वतः मान्यता दिली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा युतीचा प्रस्ताव ङ्गेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरील प्रादेशिक पक्षांबरोबर युतीला अखिल भारतीय कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मान्यता दिली असून अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी घेणार आहेत.

युतीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर जागा वाटप जवळजवळ निश्‍चित झाले आहे. चर्चेअंती गोवा ङ्गॉरवर्डला ४ मतदारसंघ सोडण्यात आले आहेत. त्यात ङ्गातोर्डा (विजय सरदेसाई), शिवोली (विनोद पालयेकर), साळगाव (जयेश साळगावकर) व पर्वरी या मतदारसंघांचा समावेश आहे. बाबूश यांच्या युगोपला पणजी मतदारसंघ (बाबूश मोत्सेर्रात) तर त्यांच्या मर्जीतील उमेदवार टॉनी ङ्गर्नांडिस (सांताक्रुझ), जेनिङ्गर मोन्सेर्रात (ताळगाव), ङ्ग्रांसिस सिल्वेरा (सांत आंद्रे) यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
वरील पक्षांबरोबर युती करण्यास प्रदेशाध्यक्ष लुईझिन ङ्गालेरो, अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे सचिव गिरीष चोडणकर व त्यांच्या समर्थकांचा विरोध होता. मात्र, कॉंग्रेसच्या भवितव्यासाठी निवडणुकीत युती झालीच पाहिजे असा आग्रह विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी धरल्याने युती प्रस्तावाला अनुकूलता दाखविण्यात आली. दरम्यान, युतीच्या निर्णयावर गोवा ङ्गॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी समाधान व्यक्त केले आहे.