पेडण्यात राजेंद्र आर्लेकरच!

0
129

>> पर्रीकरांच्या शिष्टाईनंतर तिढा सुटला

 

पेडणे मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे. काल संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यामुळे श्री. आर्लेकर यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.
संरक्षणमंत्र्यांनी शिष्टाई करताना नाराज बनलेल्या काही कार्यकर्त्यांची समजूत काढली. यामुळे पेडण्याचे भाजपचे विद्यमान आमदार आर्लेकर यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे उमेदवारीचा प्रश्‍न प्रलंबित होता. यामुळे संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी धारगळ, पोरस्कडे, पेडणे येथे भाजप प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन रुसलेल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली.
यावेळी पर्रीकर यांनी कार्यकर्त्यांना आपापसातील हेवेदावे विसरून २०१२ ची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले.