कॉंग्रेस उमेदवारांची उद्या घोषणा

0
92

>> लुईझिन फालेरो यांची माहिती

 

कॉंग्रेस पक्ष गोवा विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची नावे उद्या १० रोजी जाहीर करणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक १० रोजी नवी दिल्ली येथे होत आहे. ती झाल्यानंतर तात्काळ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे फालेरो यांनी काल स्पष्ट केले.
केेंद्रीय समितीच्या नवी दिल्ली येथे होणार असलेल्या बैठकीला हजर राहण्यासाठी आपणासह विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे व अन्य वरिष्ठ नेते आज ९ रोजी नवी दिल्लीला जाणार असल्याची माहितीही फालेरो यांनी दिली. दरम्यान, परवा ११ रोजीपासून विधानसभा निवडणुकीसाठीचे अर्ज भरणे सुरू होणार असून त्यामुळे सर्व पक्ष आपले उमेदवार जाहीर करण्याच्या गडबडीत आहेत. भाजपने यापूर्वीच आपले २१ तर आम आदमी पार्टीने ३७ उमेदवार जाहीर केलेले आहेत. कॉंग्रेस पक्षाने अद्याप एकही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. गोवा फॉरवर्ड, मगो आदी पक्षांनीही आपले उमेदवार जाहीर केलेले
नाहीत.