आम आदमी पक्षाचे पाच महिला उमेदवार

0
117

गोव्यातील आघाडीचे पक्ष महिलांना उमेदवारी देण्याचे टाळत असतानाच गोव्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पार्टीने मात्र एकूण ५ महिलांना उमेदवारी दिलेली आहे. पक्षाने ताळगाव मतदारसंघातून सेसिल रॉड्रिग्ज, हळदोणे मतदारसंघातून रोझी उर्सुला डिसोझा, म्हापशातून श्रद्धा खलप, बाणावलीतून रॉयला फर्नांडिस व वास्कोतून लॉरेटा डिसोझा यांना उमेदवारी दिलेली आहे.

आम्ही महिला व पुरुष यांच्यात भेदभाव करीत नाहीत. त्यामुळेच आम्ही एवढ्या संख्येने महिलांना उमेदवारी दिली आहे, असे पक्षाचे नेते ऍश्‍ली सुझारियो यांनी सांगितले. अन्य पक्षही जर महिलांचा आदर करीत असतील तर त्यांनीही महिलांना उमेदवारी देऊन ते सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान रुझारियो यांनी दिले.
भाजपने एलिना साल्ढाणा या एकमेव महिलेला उमेदवारी दिलेली आहे. कॉंग्रेसमध्येही जेनिफर मोन्सेर्रात या एकमेव महिला आमदार आहेत. भाजप व कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षानी यावेळी जास्त महिलांना उमेदवारी देऊन महिलांचा आदर करतो हे दाखवून द्यावे, असे ते म्हणाले. मगो पक्षही महिलांना डावलत असल्याचा आरोप त्यांनी केला.