कॉंग्रेसच्या उमेदवारांची निवड १२ रोजी जाहीर होणार

0
81

येत्या दि. ४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे उमेदवार दि. १२ रोजीपर्यंत जाहीर होतील. असे अ. भा. कॉंग्रेस सचिव गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

गोवा फॉरवर्डने आपला युतीचा प्रस्ताव केंद्रीय नेत्यांना सादर केला आहे. त्यामुळे त्यावर पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, असेही चोडणकर म्हणाले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई हे गोवा फॉरवर्डचे सदस्य नाहीत, असेही त्यांनी सांगितले. येत्या दि. १० रोजी केंद्रीय निवड समितीची बैठक होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
भाजपने शैक्षणिक माध्यम हा महत्वाचा विषय असल्याचे जाहीर केले आहे. कॉंग्रेस पक्षाने राबविलेल्या माध्यम धोरणावरच भाजपने शिक्कामोर्तब केले व वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन त्यांनी गार्‍हाणे घातले होते. भाजप नेत्यांनी देवाचीही फसवणूक केल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. भाजपचा कारभार एकच व्यक्ती चालवित असून ते म्हणजे मनोहर पर्रीकर होय. कॉंग्रेस आपल्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊनच निर्णय घेते, असे ते म्हणाले.
अन्य राज्यात बदली झालेले काही आयपीएस अधिकारी अजून येथील सेवेत आहेत. निवडणूक आयोगाने शेच्छा हा विषय हाताळावा व कारवाई करावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.