कठोर कारवाई होणार

0
76

बॅनर्स, पोस्टर्स लावल्यासगोवा विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने यावेळी आचारसंहिता अधिक कडक केली असून आयोगाच्या आदेशानुसार काल उत्तर गोव्यातील व दक्षिण गोव्यातील मिळून ३३८० बॅनर्स काढून टाकले तर काढून टाकण्यात आलेल्या पोस्टर्सची संख्या २८५० एवढी आहे. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवारांनी बॅनर्स-पोस्टर्स लावण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार्‍या उमेदवारांना वाजत-गाजत येता येणार नाही. निवडणूक काळात दुचाकींची मिरवणूक काढण्यावर निर्बंध घातले असून फक्त दहा दुचाकी वाहनांची मिरवणूक काढता येईल. अन्य गटाला दोनशे मिटरांचे अंतर ठेवावे लागेल. मुख्य निवडणूक अधिकार्‍यांची परवानगी न घेता कुठेही रोडशो करता येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना, वाहतुकीला अडथळा होऊ नये याचा विचार करूनच निर्बंध घातल्याचे कुणाल यांनी सांगितले.
जात, धर्म, भाषा यांच्या वापराच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे दिल्यानंतरच त्यानुसार योग्य पध्दतीने अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक उपस्थित होते.