जनधन खातेधारकांनी पंधरवड्यात काढले ३,२८५ कोटी रुपये

0
114

देशभरात जनधन खातेधारकांनी गेल्या १५ दिवसांत आपल्या खात्यांमधून ३२८५ कोटी रुपये काढले असल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार देशभरातील जनधन खातेधारकांच्या खात्यांवर ८ नोव्हेंबरपासून ७ डिसेंबरपर्यंत ७४,६१० कोटी रुपये जमा झाले होते.

विशेष म्हणजे जनधन खात्यांचा दुरुपयोग होऊ न देण्यासाठी या खात्यांमधील पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती. महिन्याला एका जनधन खातेधारकास दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा घालण्यात आली होती. असे असले तरी गेल्या १५ दिवसांतच या खात्यांमधून सुमारे ३२८५ कोटी रुपये काढण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची मर्यादाही ५० हजार रुपये आहे. ‘नोव्हेंबरला २५.५ कोटी जनधन खात्यांमध्ये एकूण ४५,६३६.६१ कोटी रुपये जमा झाले होते. २ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या घोषणेनंतर एका महिन्यात या खात्यांमधील जमा २८,९७३ कोटी रुपयांनी वाढली. २०१४मध्ये सुरू झालेल्या जनधन खात्यांमध्ये सर्वाधिक रक्कम जमा करण्यात उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर प. बंगाल व राजस्थान ही राज्ये आहेत. या खातेधारकांसाठी ‘झिरो बॅलन्सची’ सुविधा आहे.