राज्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

0
114

मावळत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सासष्टी तालुक्यांतील कोलवा, बेताल भाटी, सेर्नाभाटी, बाणावली समुद्र किनार्‍यावर हजारो देशी-विदेशी पर्यटकांनी गर्दी केली होती. विदेशी पर्यटकांबरोबर गोव्या बाहेरील महाराष्ट्र, कर्नाटक. आंध्र प्रदेश राज्यांतून हजारो पर्यटकांनी या किनारपट्टी भागात गर्दी केली होती. कोलवा व बाणावली येथे तीस ते पस्तीस हजार पर्यटकांनी समुद्र किनारा गजबजून गेला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. उत्तर गोव्यातील किनारी भागातही अशीच स्थिती होती.

कोलवा येथे सर्व मोकळ्या जागा दुचाकी व चारचाकी वाहनांन भरून गेल्या. तर समुद्र किनार्‍यावर रंगीबेरंगी कपडे परिधान केलेले पर्यटक यांनी फुलून गेले होते. यात स्थानिक लोकही सामील झाले. पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत संगीताच्या तालावर पर्यटक व स्थानिक थिरकले. सायंकाळी चार वाजल्यापासून किनारपट्टी भाग पुरुष महिला, तरुण तरूणीनी भरून गेला होता किनारीपट्टी भागात जाणारे रस्ते वाहनाने पार्क केल्याने हजारो लोकांनी दोन किलोमीटर अंतर पायी चालून जावे लागले.
रात्रौ १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी कर्णकर्कश संगीताच्या तालावर नृत्याची गाणी यामुळे वेगळेच वातावरण निर्माण झाले. किनारी भागांत पाट्यांमध्ये उपस्थितांनी नृत्याचा तालावर व दारूचे ग्लास हातात घेऊन नव वर्षाचे स्वागत केले. पहाटे परत येताना किनार्‍यांवर दोन तास लोक अडकवून पडले. रस्त्यांवर वाहनाची कोंडी व पोलिसांची कमतरता यामुळे लोकांनी पोलिस खात्यावर नाराजी व्यक्त केली. कोलवा पोलीस यंत्रणेने योग्य खबरदारी न घेतल्याने ही कोंडी झाली अशी चर्चा होती. समुद्र किनार्‍यावरील प्रमुख रस्ते व शहरांतील रस्त्यांवरच पोलिस तैनात होते.