भीम ऍप ः एक ओळख

0
116

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आपल्या मोबाईलवरून सुलभ आर्थिक व्यवहार करता यावेत यासाठी ‘भीम’ या ऍपचे अनावरण केले आहे. ‘भीम’ चे पूर्ण नाव ‘भारत इंटरफेस फॉर मनी’ असे असून डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नावाचाही त्याला संदर्भ आहे. इतर युनिफाईड इंटरफेस (यूपीआय) ऍप्सशी आणि बँक खात्यांशी त्याद्वारे समन्वय साधला जाणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ते विकसित केले आहे.

> ‘भीम’ कसे काम करते?
> आपले बँक खाते ‘भीम’ मध्ये नोंद करा आणि खात्यासाठी यूपीआय पीन क्रमांक निश्‍चित करा.
> आपला मोबाईल क्रमांक हा आपला ‘पेमेंट ऍड्रेस’ किंवा पैसे स्वीकारण्याचा पत्ता बनेल आणि आपण सहजपणे पुढील व्यवहार करू शकाल –
> पैसे स्वीकारणे आणि पाठवणे ः आपले मित्र, कुटुंबीय, ग्राहक आदींशी मोबाईल क्रमांकाद्वारे किंवा पेमेंट ऍड्रेसद्वारे आपण पैशांची देवाणघेवाण करू शकाल. आयएफएससी आणि एमएमआयडी वापरणार्‍या व बिगर – यूपीआय बँकांकडेही या ऍपमधून पैसे पाठवता येतील.
> खात्यातील शिल्लक तपासणे
> क्यू आर कोड – गतिमान व्यवहारासाठी आपण क्यू आर कोड स्कॅन करू शकता. दुकानदार आपला क्यू आर कोड ग्राहकांना स्कॅन करता यावा यासाठी ठळक जागी लावू शकतील.
> या ऍपद्वारे आर्थिक व्यवहाराची मर्यादा प्रति व्यवहार दहा हजार रुपये व २४ तासांसाठी २० हजार रुपये राहील.
> हिंदी आणि इंग्रजी भाषेत सध्या हे ऍप आहे व त्यावर इतर भाषाही येणार आहेत.