२८ मतदारसंघांतून लढण्याची मगो पक्षाची तयारी ः सुदिन

0
88

विधानसभा निवडणुकीत आम्ही २८ मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली आहे आणि २२ मतदारसंघांत त्यासंबंधीची तयारी पूर्ण झाली आहे, असे मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले. २१ जागा मगो जिंकणार असा दावाही त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. जर मगो पक्षाची कुठल्याही पक्षाबरोबर युतीसंबंधीची बोलणी ङ्गलदायी होऊ शकली नाही, तर पक्ष ‘एकला चलो रे’चे धोरण अवलंबिणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोवा सुरक्षा मंचबरोबर युतीसाठीची बोलणी ३० रोजी संध्याकाळी होणार असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नावर स्पष्ट केले.

भाजपबरोबर मगोने काही विशिष्ट कारणांसाठी ङ्गारकत घेतल्याचे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. पर्रीकर व मी चांगले मित्र आहोत ही गोष्ट खरी असून आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने राज्यात २० हजार कोटींची विकासकामे सुरू केली असल्याचे ते म्हणाले. भाजपबरोबर मगो युती करणार काय असे पत्रकारांनी विचारले असता निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे देणार असल्याचे ते म्हणाले.
सरकारने दक्षिण गोवा पीडीएचे चेअरमनपद अन्य पक्षाच्या आमदाराला दिले होते. मात्र, मगोच्या कार्यकर्त्यांना काहीही देण्यात आले नाही, असे ते म्हणाले. मागील वर्षभरापासून मगो पक्षात प्रचंड नाराजी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आर्चबिशप ङ्गिलीप नेरी ङ्गेर्रांव यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे जे आरोप केलेले आहेत त्याविषयी विचारले असता त्या भ्रष्टाचारात आपला हात नसल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. कॉंग्रेस नेते एम. के. शेख यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनुद्गार काढल्याबद्दल ढवळीकर यांनी त्यांचा समाचार घेतला. स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिलेल्या या नेत्याची शेख यांनी माङ्गी मागावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.