पर्वरी महामार्गावर वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून रुग्णांचे हाल

0
108

म्हापसा – पर्वरी महामार्गावर मेगाब्लॉक होण्याचा प्रकार नित्याचाच झाला असून काल शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारपर्यंत झालेल्या वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका अडकून पडल्याने रुग्णांचे हाल झाले. पणजीला पोहोचण्यासाठी मेगाब्लॉकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकांबरोबरच इतर वाहनचालकांना दोन ते अडीच तास लागत होते.

नववर्ष साजरे करण्यासाठी परराज्यांतील पर्यटकांच्या वाहनांचे प्रमाण वाढल्याने या कोंडीत काल अधिकच भर पडली होती. वाहनचालकांनी कोंडीला टाळण्यासाठी पर्वरीतील अंतर्गत मार्गांचा वापर सुरू केल्याने अंतर्गत अरुंद मार्गावरही वाहनांची दिवसभर कोंडी झाली होती. त्यामुळे पर्वरीतील अंतर्गत भागात राहणार्‍या नागरिकांना दैनंदिन व्यवहार करणेही कठीण झाले होते. कोंडीमुळे हैराण झालेल्या वाहनचालकांनी वाहने बेती रस्त्यावरून ङ्गेरीबोटीजवळ जाण्यासाठी वळविल्याने बेती ङ्गेरीबोटीसमोरील रस्त्यावरही वाहतुकीचा फज्जा उडाला होता.