दाबोळीतून माविनना भाजपचा उमेदवारीसाठी हिरवा कंदील?

0
93

कॉंग्रेस आमदार माविन गुदिन्हो यांना येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर दाबोळीतून निवडणूक लढविण्यास भाजपने हिरवा कंदिल दाखविला आहे. त्यामुळे श्री. गुदिन्हो यांनी त्या दृष्टीकोनातून काम सुरू केले आहे. त्यामुळे दाबोळी मतदार संघ मगोच्या हातातून निसटल्याचे स्पष्ट झाले आहे. मगोने दाबोळी सोडण्यास नकार दिला होता. एकूण युतीच्या प्रश्‍नावर सध्या मगो कार्यकर्त्यांमध्य असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपबरोबर युती केली तरी भाजप कार्यकर्ते मगो उमेदवारीसाठी गंभीरपणे काम करतील याची शाश्‍वती नाही, असे फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यांचेही म्हणणे आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी मात्र अद्याप या विषयावर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे कार्यकर्ते गोंधळले आहेत.