बेतकी-खांडोळा येथे ट्रकच्या धडकेने ५ वर्षीय मुलगा जखमी

0
91

तामसुली-बेतकी खांडोळा येथे काल दुपारी आयशर ट३कची धडक बसून दीपक पासवान हा पाच वर्षांचा मुलगा जखमी झाला. जखमीवर गोमेकॉत उपचार चालू आहेत. जीए ०१ टी ९१६९ हा आयशर ट्रक माशेलहून बेतकी येथे जात होता. तामसुली येथे पोहोचताच रस्त्यावरून चालत जाणार्‍या दीपक या पासवान या मुलाला त्या ट्रकची धडक बसली. त्यामुळे दीपकच्या पायाला गंभीर जखम झाली. फोंडा पोलिसांनी ट्रकचालक इब्राहीम भद्रापूर (इंदिरानगर, चिंबल) याला ताब्यात घेतले आहे.