मयेवासियांना त्वरीत सनदींसाठी अतिरिक्त मामलेदार

0
91

>> मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती

 

मयेवासियांना शक्य तितक्या लवकर जमिनीच्या सनदी मिळाव्यात म्हणून अतिरिक्त मामलेदारांची नियुक्ती करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल दिली. सनदी देण्याची प्रक्रिया दीर्घकाळाची असते. त्यामुळे त्यासाठी ठराविक मुदतीच्या काळातच ते काम पूर्ण होईल, असे सांगणे शक्य नसते, असे ते म्हणाले.

दरम्यान मयेवासियांना न्याय देण्याच्या प्रश्‍नावर सरकारने फसवणूक केल्याचे मये भूविमोचन समितीचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर यांनी सांगितले. मयेचे आमदार तथा सभापती अनंत शेट यांनी काल सचिवालयात जिल्हाधिकारी, मामलेदार व अन्य संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस मये भूविमोचन समितीलाही निमंत्रण दिले होते. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेही यावेळी उपस्थित
होते.
सरकारने काही लोकांना तात्पुरत्या सनदी दिलेल्या असल्या तरी दोन महिन्यांच्या आत त्याला कायम रूप देण्याची गरज होती.
आता निवडणूक जवळ आल्याने कोणत्याही क्षणी निवडणूक आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया थंडावतील, असे मयेकर यांनी सांगितले. या प्रश्‍नावर मयेवासियांच्या आशा मावळल्याचे ते म्हणाले.