रोजगार निर्मितीसाठी चांगले उद्योग यावेत

0
87

>> पर्रीकर : होंड्यातील हेलिकॉप्टर इंजिन दुरुस्ती प्रकल्पाचे उद्घाटन

 

रोजगार निर्मितीसाठी गोव्यात चांगल्या कंपन्या आल्या पाहिजेत आणि गोवा त्यादृष्टीने योग्य राज्य आहे असे उद्गार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी होंडा-सत्तरी येथे हेलीकॉफ्टर इंजिन एम. आर. ओ. प्री. लिमिटेड कंपनीच्या कारखान्याच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले.
या प्रकल्पामुळे नव्या युगाची सुरूवात झाली असून ५७० कोटी रुपये खर्चुन हा प्रकल्प सुरू केला आहे. कंपनीला संरक्षण दलाच्या ताफ्यात असलेल्या एक हजार हेलीकॉप्टर दुरुस्तीचे काम देण्यात आले आहे. गोव्यात अजुनही अनेक चांगल्या कंपन्या येणार आहेत. कशा स्वरूपाच्या नोकर्‍या पाहिजेत याचा विचार करूनच तशी रचना केली जात आहे. गोवा शिपयार्ड कंपनीला ३२ हजार कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण केला जाईल असे त्यांनी सांगितले.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर केंद्रात जाऊन सुध्दा त्यांचे लक्ष गोव्यावर आहे. त्यामुळे चांगल्या कंपन्या गोव्यात येत आहेत. येत्या ८ नोव्हेंबर रोजी मोपा विमानतळाच्या करारावर सही केली जाणार असून, पुढील पंधरा दिवसात मोपा विमानतळाची पायाभरणी होईल. असे ते म्हणाले. कामगारांचा आधार घेऊन संप करणार्‍या ढोंगी कामगार नेत्यांना बाहेर फेकले पाहिजे. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांची स्तुती करताना मुख्यमंत्री म्हणाले की गेली साडेचार वर्षे विरोधी पक्षनेत्यांनी चांगल्या कामात कधीच आडकाठी आणली नाही. त्यांनी सतत चांगली भुमिका घेतली असे त्यांनी सांगितले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विरोधीपक्ष नेते प्रतापसिंह राणे, सभापती अनंत शेट, ईडीसीचे चेअरमन आमदार सिध्दार्थ कुंकळकर, आमदार प्रमोद सावंत उपस्थित होते.