२५ लाखांच्या विदेशी चलनासह एकास अटक

0
131

गोव्याहून दुबईला जाणार्‍या एका व्यक्तीला दाबोळी विमानतळ गुप्तचर पथकाने दाबोळी विमानतळावर विदेशी चलन घेऊन जात असताना अटक केली. यावेळी त्याच्याकडून विदेशी चलन जप्त करण्यात आले. भारतीय चलनानुसार त्याची किंमत २५ लाख रुपये आहे.

काल पहाटे दाबोळी विमानतळावरून एअर अरेबिया जी- ९ ४९३ विमानाने दुबई व्हाया शारजा येथे जाण्याच्या तयारीत असलेल्या अन्वर सादीक अब्दुल रहिमान याचा गोवा कस्टम पथकाला संशय आल्याने त्याच्या हातातील बॅगेची तपासणी केली. यावेळी त्याच्या बॅगेत विदेशी चलन साऊदी कतार, रियाल, दिराम व अमेरिकन डॉलर आढळले. त्याची किंमत भारतीय चलनानुसार २५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. कस्टम विभागाने त्याला ताब्यात घेतले.