मराठी राजभाषेच्या मागणीसाठी नोव्हेंबरमध्ये महामेळावा

0
81

>> फोंड्यातील बैठकीस सावळ, मामलेदार हजर राहणार

 

सरकारने कोकणीबरोबरच मराठी राजभाषा जाहीर करावी या मागणीसाठी १३ नोव्हेंबर रोजी पणजीच्या आझाद मैदानावर मराठीप्रेमींचा महामेळावा भरवण्याचे मराठी राजभाषा समितीने ठरवले असून त्यासंदर्भात राज्यात जनजागृती करण्यात येत आहे. या मेळाव्याला किमान तीन हजार मराठीप्रेमी उपस्थित राहावेत असा समितीचा प्रयत्न असून त्यासंदर्भात ठिकठिकाणच्या मराठीप्रेमींशी संपर्क साधण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
पूर्वतयारीचा भाग म्हणून गोव्याच्या विविध भागांत बैठका घेण्यात येणार असून पहिली बैठक फोंडा येथील विश्‍व हिंदू परिषदेच्या सभागृहात येत्या २ ऑक्टोबर रोजी सकाळी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत डिचोलीचे आमदार नरेश सावळ आणि फोंड्याचे आमदार लवू मामलेदार हेही सहभागी होणार आहेत. या बैठकीत महामेळाव्याच्या आयोजनाच्या पूर्वतयारीसंबंधी नियोजन केले जाईल.