दाबोळी विमानतळावर ६५ लाखांचे सोने जप्त

0
89

दाबोळी विमानतळावर काल पहाटे एअर इंडिया ९९४ या विमानाच्या प्रसाधनगृहातून तीन काळ्या पिशव्यात लपवलेले ६५ लाखांचे सुमारे अडीच किलो सोने हस्तगत करण्यास कस्टम अधिकार्‍यांना यश आले.

कस्टम अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार काल पहाटे एअर इंडियाचे विमान दाबोळी विमानतळावर उतरले असता यात पाहणी केली असता प्रसाधनगृहात तीन काळ्या प्लास्टिक पिशव्या नजरेस आल्या. त्यांनी त्या बॅगांविषयी सर्वांकडे चौकशी केली असता कोणीही त्यावर आपला दावा केला नाही. सदर बॅगा मग कस्टम अधिकार्‍यांसमक्ष उघडून पाहिल्या असता त्यात सोन्याच्या वस्तू व तीन सोन्याच्या कांड्या मिळून अडीच किलो वजनाच्या सुमारे ६५ लाख किंमतीचे सोने सापडले.
कस्टम अधिकारी एस. के. सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. या महिन्यात दोन वेळा सुमारे २२ लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.