शुक्रवारी देशव्यापी संपाचा इशारा

0
93

>> बँका, सरकारी कार्यालये, कारखाने बंद ठेवणार

 

देशातील कामगार संघटनांनी येत्या शुक्रवारी बँका, सरकारी कार्यालये व कारखाने बंद ठेवून देशव्यापी संपाचा इशारा दिला असून या पार्श्‍वभूमीवर काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर वित्तमंत्री अरुण जेटली, ऊर्जामंत्री पियुष गोयल व मजुरमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्याबरोबर तातडीची बैठक घेऊन चर्चा केली.
देशातील कामगार संघटनांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारकडे १२ प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. त्यांची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ देशभरातील शुक्रवारी बँका, सरकारी कार्यालये व कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला आहे. रेल्वे कर्मचार्‍यांचा या बंदात सहभाग अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कामगारांच्या किमान वेतनात मासिक ९ हजार रु. वरून १८ हजार रु. अशी वाढ करावी ही १२ प्रमुख मागण्यांपैकी एक महत्त्वाची मागणी असल्याचे सांगण्यात आले.