डिचोलीतील युवतीच्या खूनप्रकरणी दोघा आरोपींना जन्मठेप

0
114

म्हापसा येथील अतिरिक्त न्यायालयाने २००९ साली गोव्यात गाजलेल्या चार सिरीयल खून प्रकरणातील आरोपी चंद्रकांत तलवार उर्ङ्ग पप्पू तसेच सायरन रॉड्रिगीस यांना डिचोली येथील

शर्मिला मांद्रेकर हिच्या अपहरण, खून तसेच बलात्कार प्रकरणात जन्मठेप दिली. मात्र, वेर्णा येथील कोसेसांव डिसोझा हिच्या अपहरण, खून व बलात्कार प्रकरणात पुरव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. याच प्रकरणात तिसर्‍या खूनप्रकरणी सुनावणी पूर्ण करण्यात आली असून पुढील महिन्यात निकाल ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी एकूण चौघांना अटक केली होती. यात पप्पू व सायरन व्यतिरिक्त पप्पूची पत्नी ग्रीश्मी तलवार उर्ङ्ग सोनी तसेच एका अल्पवयीन मुलीचा समावेश होता. सोनीला दोन्ही प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले तर चौथी आरोपी अल्पवयीन असल्याने तिच्यावरील याच प्रकरणातील खटला पणजीतील बाल न्यायालयात प्रलंबित
आहे.
स्वतःची हौस भागवण्यासाठी मुलींना आपल्या वाहनातून लिफ्ट देण्याचा बहाणा करून नंतर त्यांना लुबाडून त्यांची हत्त्या करण्याचे कृत्य या आरोपींनी केले होते. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जाळून टाकण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.
ऑक्टोबर २००९ साली या घटना गोव्यातील वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या होत्या. गोव्यात ही खूनाची मालिका केल्यानंतर आरोपी मुंबईला पळून गेले होते.