विद्यापीठ मंडळ निवडणुकीत भाजपचे पॅनल विजयी

0
96

गोवा विद्यापीठात झालेल्या विद्यार्थी मंडळ निवडणुकीत भाजपचे पॅनल विजयी झाल्याचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष शर्मद पै रायतुरकर यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मंडळाच्या चेअरमनपदी सिध्देश सतीश नाईक, सरचिटणीसपदी तुषार वामन केळकर, महिला प्रतिनिधीपदी आदिती नार्वेकर तर सदस्य म्हणून निकिता चोपडेकर, संतोषी गुप्ता, श्वेता मोरे, उर्वेश रेडकर व निशीकर देसाई यांची निवड झाल्याची माहिती त्यांनी दिली.

निवड झालेल्या मंडळ सदस्यांचा भाजप कार्यालयात कला व संस्कृती खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेंकर यांच्याहस्ते पुष्पहार घालून गौरव करण्यात आला.
दरम्यान, निवडणुकीच्या वेळी काल गोवा विद्यापीठात एन्‌एसयूआय् व भाजपचे विद्यार्थी यांच्यात मारामारी झाली. भाजप विद्यार्थी विभागातर्फे या संदर्भात पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे.