अंजुणे धरण

0
107

अंजुणे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून गेल्या दोन दिवसांपासून परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे चारही दरवाजे काल पुन्हा खुले करण्यात आले. धरणातून ३ क्यूसेक पाणी सोडण्यात येणार असल्याचे अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर यांनी माहिती देताना सांगितले. यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. डिचोलीत काल ३.५ इंचच्या आसपास पाऊस झाला.