भारताने दिलेले दाऊदचे ९ पैकी ३ पत्ते चुकीचे

0
73

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे भारताने दिलेल्या ९ पैकी तीन पत्ते चुकीचे असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका समितीने सांगितले आहे. तीनपैकी एक पत्ता यूएनमधील पाकिस्तानचे प्रतिनिधी मलीहा लोधी यांचा असल्याचे म्हटले आहे. भारताने दाऊदच्या पाकिस्तानमधील ठिकाणांबाबत यूएन व पाकला पुरावे दिलेले आहेत.

अल कायदावर बंदी घालणार्‍या समितीने जेव्हा या पत्त्यांचा शोध घेतला तेव्हा भारताने दिलेल्या दाऊदच्या ९ पत्त्यांपैकी ३ चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. चुकीच्या पत्त्यांपैकी एक पत्ता युनोचे राजदूत मालेहा लोधी यांचा असल्याचे समोर आले आहे. मेन प्रॉपर्टी, मार्गेला रोड, एफ-६/२ स्ट्रीट नं. २२, घर नं. ०७, इस्लामाबाद हा पत्ता लोधी यांचा असल्याचे युनो समितीने म्हटले आहे. त्याचबरोबर आठवा मजला, मेहरान स्न्वेअर, परदेशी हाउस-३, तलवार एरिआ, क्लिफटन, कराची व ६/अ, कजुबाम तंजीम, फेज-५, डिफेन्स हौसिंग एरिया, कराची हे दोन्ही पत्ते चुकीचे असल्याचे समितीने म्हटले आहे. मात्र, या समितीने आतापर्यंत भारताने दिलेल्या पत्त्यांबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. भारताने पाकिस्तानकडे जे पुरावे सोपवले होते, त्यात ९ दाऊदच्या पाकमधील ९ ठावठिकाणांचा उल्लेख होता. या पत्त्यांवर दाऊद ये-जा करीत असल्याचे भारताने म्हटले होते.