अपना घरातून ९ मुलींचे पलायन

0
110

>> तिघांना पकडले

>> ६ पळून जाण्यात यशस्वी

मेरशी येथील अपना घरमधून सोमवारी रात्री ९ मुलींनी पलायन करण्याची घटना घडली. त्यांपैकी तिघाजणांना जुने गोवे पोलिसांनी पकडले. पैकी दोघा जणांना मेरशी येथे तर एका युवतीला पणजी येथे पकडण्यात आल्याची माहिती जुने गोवे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सगुण सावंत यांनी दिली.
पकडण्यात आलेल्या युवतींपैकी एक युवती ही बांगलादेशी, एक नवी दिल्ली व एक मुंबईची असल्याचे पोलिसांनी सांगितले. अन्य सहा युवती मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. त्यात तीन बांगलादेशी, एक तुर्की, एक नेपाळी व एका मुंबईच्या युवतीचा समावेश आहे. पळून जाण्यापूर्वी या युवतींनी या सुधारगृहातील एका महिला शिपायासह दोघांना दोरखंडाने बांधून घातले व नंतर चावीचा वापर करून मागील दार उघडून पोबारा केला.
जुने गोवे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शोधाशोध सुरू केला असता दोघी युवती मेरशी येथे तर एक पणजी येथे सापडली. मात्र, अन्य सहाजणी पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. त्यांचा शोध घेण्याचे काम जारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.