‘आप’ची पहिली यादी सप्टेंबरमध्ये

0
81

आम आदमी पार्टी गोवा विधानसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या उमेदवारांची पहिली यादी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

पक्षाचे कार्यकर्ते व स्वयंसेवक या कामी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. उमेदवारांची निवड कशी करण्यात येणार आहे त्याविषयी माहिती देताना गुप्ता म्हणाले की, दर एका मतदारसंघातील सक्रीय कार्यकर्ते व स्वयंसेवक यांची बैठक होईल. या बैठकीत सदर कार्यकर्ते व स्वयंसेवक उमेदवारीसाठीच्या नावांची शिङ्गारस करतील. एक किंवा जास्त स्वयंसेवकही नावे सूचवू शकतील. पक्षाने नेमलेल्या निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांची बैठक होईल. तद्नंतर ज्याच्या नावांची शिङ्गारस करण्यात आलेली आहे त्यांना अर्ज करण्यासाठी बोलावण्यात येईल. ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांची नावे नंतर राज्य छाननी समितीकडे पाठवण्यात येतील. गोवा राज्यासाठीच्या या छाननी समितीची घोषणा पुढील काही दिवसांत करण्यात येईल.
ही छाननी समिती आलेल्या नावांकडून दर एका मतदारसंघासाठी ३ ते ५ नावांची यादी तयार करतील. नंतर ती पक्षाच्या राष्ट्रीय राजकीय व्यवहार समितीकडे सुपूर्द करील. त्यात गोव्यातील दोघा विशेष निमंत्रितांचा समावेश असेल. सर्वांत शेवटी ही समिती या यादींतून दर एका मतदारसंघासाठीच्या उमेदवारांची निवड करील.ही प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या शेवटी सुरू होईल. उमेदवारांची पहिली यादी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. तर संपूर्ण चाळीसही उमेदवारांची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत करण्यात येईल. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्ती, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्ती तसेच धर्मांध अशा लोकांना पक्षातर्ङ्गे उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.