गोव्यातील मच्छिमारांना समुद्रात मच्छिमारी करताना एल्ईडी दिव्यांचा वापर करण्यास मच्छिमारी खात्याने बंदी घातली आहे, अशी माहिती मच्छिमारी खात्यााचेमंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी काल गोवा विधानसभेत दिली. शून्य तासाला आमदार मायकल लोबो यांनी सदर प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना गोव्यातील ट्रॅालरवाले समुद्रात मच्छिमारी करताना एल्ईडी दिव्यांचा वापर करतात. तसेच बुल ट्रॉलिंग पध्दतीने मच्छिमारी करतात. त्यामुळे मत्स्यधनाचे मोठे नुकसान होत असून पारंपरिक पध्दतीने मच्छिमारी करणार्या रापणकारांना मासळी मिळत नसल्याचे लोबो यांचे म्हणणे होते.