ब्रिटनमधील गोवेकरांप्रश्‍नी परराष्ट्र मंत्र्यांना निवेदन

0
117

युरोपियन महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्याने पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या सुमारे २० हजार मूळ गोमंतकीयांच्या मनात भीती निर्माण झाल्याने वरील निर्णयाचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये म्हणून केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणारे निवेदन दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी स्वराज यांना सादर केले आहे. स्वराज यांनी ब्रिटनच्या प्रशासनाकडे चर्चा करून मूळ गोमंतकीयांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. दोन दिवसांपूर्वी अनिवासी भारतीय आयुक्त डॉ. विल्ङ्ग्रेड मिस्किता यांनी पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन ब्रिटनमध्ये गेलेल्यांची गोवा सरकारने चिंता करण्याचे कारण नाही, असे म्हटले होते.